सुप्रिया आरवारी विशेष पुरस्काराने सन्मानित

सुप्रिया आरवारी विशेष पुरस्काराने सन्मानित

भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ओब्स्टेट्रीक्स अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी (एएमओजीएस) या राज्यस्तरीय स्त्री-रोगतज्ज्ञांच्या संस्थेने काही निवडक सभासदांना कौतुकास्पद काम केलेल्या महिला डॉक्टरांना विशेष पुरस्कार बहाल केला. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या या वार्षिक अधिवेशनामध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात भिवंडीतील सुप्रीम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया आरवारी यांना हा पुरस्कार सुप्रसिद्ध सिनेतारिका वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एफओजीएसआय या राष्ट्रस्तरीय स्त्री-रोगतज्ज्ञांच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश पै, एएमओजीएसच्या माजी अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर, एएमओजीएसचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह परदेशी, एएमओजीएसचे सचिव डॉ. सुजाता दळवी व ‘हास्य जत्रा’चे लोकप्रिय कलाकार नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com