दिव्यात नव्या रस्त्याचे खोदकाम

दिव्यात नव्या रस्त्याचे खोदकाम

Published on

दिवा, ता. १८ (बातमीदार) : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिवा आगासन रस्ता आणि नवीन जलवाहिनीचे लोकार्पण ११ दिवसांपूर्वी झाले असले. पण त्या लाईनवर असणाऱ्या व्हॉल्ववर रस्ता कॉन्ट्रक्टर चेंबर लावायलाच विसरला असल्याचे आता पाणी विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे चेंबर बनवण्यासाठी कॉन्ट्रक्टरने नवीन तयार केलेला रस्ता खोदायला घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे.
दिवा आगासन हा किमान दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावर तीन ते चार व्हॉल्व आहेत. प्रत्येक व्हॉल्ववर चेंबर बनवणे गरजेचे असते. पण चिन्मय गेट याभागात रस्ता बनवताना कॉन्ट्रक्टरने व्हॉल्व सिमेंटने झाकून पूर्णपणे बंद करुन तो रस्ता सपाट केला. तेथे त्या व्हॉल्ववर चेंबर न बसवल्याचे उशीरा पाणी विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे दिवा आगासन रस्ता आणि नवीन जलवाहिणीचे लोकार्पण होऊनही ११ दिवसांनी पुन्हा तो चिन्मय गेट जवळीस नविन रस्ता आज तोडण्यास कॉन्ट्रक्टरने सुरुवात केल्याने मनसे आक्रमक झाली आहे. या नविन चेंबरसाठी खोदल्या जाणाऱ्या रस्त्याचा खर्च जनतेच्या खिशातूनच जाणार असल्यामुळे ही कोणती काम करण्याची पध्दत असे नागरिकांकडून विचारणा होत आहे.
अवघ्या ११ दिवसांपूर्वी लोकार्पण झालेला रस्ता व्हॉल्व्हच्या कामासाठी खोदणे म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या कामात कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदाराला दंड आकारून संबंधित महापालिका अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करायला हवी, अशी मागणी मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी केली.
....
चिन्मय गेट या भागात ६०० मीमीचा व्हॉल्व्ह आहे. त्या व्हॉल्व्हच्या दुरुस्तीसह ऑयलिंगचे काम करण्यासाठी तेथे चेंबरची गरज आहे. रस्ता बनवणाऱ्या कॉन्ट्रक्टरला तेथे व्हॉल्ववर चेंबर बनव असे सांगूनही त्याने ते बनवले नाही. त्यामुळे कॉन्ट्रक्टर स्वतः तो रस्ता तोडून चेंबर बनवून देणार आहे.
- सुरेश वाघेरे, पाणी अभियंता, दिवा प्रभाग समिती. -
....
नव्याने बांधलेला रस्ता खोदून अधिकारी जनतेचा पैसा वाया घालवणार आहेत. यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
- दिलीप धमापूरकर, नागरिक, दिवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.