पंतप्रधानांकडून पालिकेच्या वनीकरणाचे कौतुक

पंतप्रधानांकडून पालिकेच्या वनीकरणाचे कौतुक

Published on

मुंबई, ता. १८ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मध्ये पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महापाल‍िकेच्या ‘नागरी वन उपक्रमा’चे कौतुक केले. महापाल‍िका उद्यान व‍िभागाच्या ‘म‍ियावाकी’ जंगलांबाबतचा उल्लेख मोदी यांनी आपल्या भाषणात केला. मुंबईत आणखी १२ ठ‍िकाणी जंगलांचे संवर्धन केले जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून उपक्रम हाती घेतले जातात. त्यासाठी पाल‍िका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत २०२० पासून मुंबईत तब्बल ६० ठ‍िकाणी नागरी वन (मियावाकी) तयार करण्यात आले आहे. त्या जंगलांमध्ये एकूण चार लाख झाडे बहरली असून त्यामुळे मुंबईकरांना शुद्ध हवा मिळत आहे. आजच्या ‘मन की बात’मध्येही मोदींनी पाल‍िकेच्या म‍ियावाकी जंगलांबाबत उल्लेख केला. ६० ठ‍िकाणी जंगल व‍िकस‍ित केल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमाविषयी कौतुक केले. मुंबई महानगरात तब्बल ६० ठ‍िकाणी अशी जंगले व‍िकसित केली गेली असून त्यात चार लाख झाडे आहेत. आणखी १२ ठ‍िकाणीही असे जंगल तयार करण्याचे काम सुरू असून, त्याद्वारे नवीन एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत.

तीन वर्षांपूर्वी मुंबईत मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली. त्यासाठी साठहून अधिक भूखंडांची न‍िवड करण्यात आली. त्याअंतर्गत आतापर्यंत तब्बल चार लाखांहून अधिक झाडे लावली गेली आहेत. व‍िशेष म्हणजे मियावाकी जंगलांमुळे मुंबईपासून दूर गेलेले अनेक पक्षी आणि कीटकांच्या प्रजाती पुन्हा परतल्या आहेत. पाल‍िकेने आपल्या मोहिमेत काही एनजीओ आण‍ि व्यावसाय‍िक संघटनांचीही मदत घेतली आहे. या उपक्रमाची जपान सरकारनेही दखल घेतली असून पत्राद्वारे कौतुक केले आहे. महापाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाकडून येत्या वर्षभरात मुंबईमध्ये २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

जागतिक वृक्षनगरी
मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल जागतिक स्तरावरही घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाऊंडेशनकडून ‘जागतिक वृक्ष नगरी’सारखा अत‍िशय प्रत‍िष्ठेचा पुरस्कार २०२१ आण‍ि २०२२ अशी सलग दोन वर्षे मुंबई महानगराला म‍िळाला आहे. नागरी वन उपक्रमात (म‍ियावाकी) वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

मुंबईची वृक्षसंपदा
पाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाने आतापर्यंत नागरी वन उपक्रमात (म‍ियावाकी) चार लाख झाडे लावली आहेत. दरवर्षी पारंपर‍िक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्यात येतात. त्यामुळे सध्या मुंबई शहराच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे. ठ‍िकठ‍िकाणी उद्याने व‍िकसित करण्यात आली आहेत. सध्या मुंबईकरांच्या सेवेत तब्बल १०६८ उद्याने आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.