खासगी बसची ‘बेस्ट’ला धडक

खासगी बसची ‘बेस्ट’ला धडक

Published on

खासगी बसची ‘बेस्ट’ला धडक
चालक-वाहकासह तीन प्रवासी जखमी
मुंबई, ता. १८ ः चुनाभट्टीजवळील एवरार्ड नगरमध्ये आज सकाळी एका खासगी प्रवासी बसने बेस्टला दिलेल्या धडकेत चालक व वाहकासह तीन प्रवासी जखमी झाले. एका महिला प्रवाशावर उपचार सुरू आहेत.
आज सकाळी सात वाजता वांद्रे आगाराची सीबीडी बेलापूरकडे जाणारी बस एव्हरार्ड नगर परिसरात आली असता एका खासगी ट्रॅव्हलच्या लक्झरी बसची तिला मागून धडक लागली. अपघातात बेस्ट बसमधील तीन प्रवासी, चालक आणि वाहक जखमी झाले. सायन रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. महिला प्रवासी कविता कदम (६२) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची नोंद चुनाभट्टी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com