बेकायदा रुग्णालयात महिलेचा विनयभंग

बेकायदा रुग्णालयात महिलेचा विनयभंग

Published on

मुंबई, ता. १८ : मुंबईच्या गोवंडी परिसरात विनयभंग केल्याप्रकरणी एका रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या तपासात गोवंडी भागातील हे नर्सिंग होम बेकायदा असल्यामुळे नर्सिंग होमच्या प्रमुखावर गुन्ह्याची नोंद केली आहे.
याप्रकरणी डॉ. इरफान सय्यद आणि कर्मचारी शोएबला अटक केली असून त्यांचा एक साथीदार जमिलचा पोलिस शोध घेत आहेत. गोवंडी परिसरातील आदर्श नावाच्या नर्सिंग होममध्ये याप्रकरणी तक्रारदार आपल्या पत्नीच्या उपचारासाठी शनिवारी रात्री गेले होते. उपचार घेत असताना तेथील एक कर्मचारी शोएब याने फिर्यादीच्या पत्नीशी अश्लील चाळे करू लागला. तेथे फिर्यादीने आरोपीला अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. आरोपी शोएबवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढे पोलिस तपासात आदर्श नर्सिंग होम बेकायदा असून विनापरवाना डॉ. इरफान सय्यद रुग्णालय चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.