मनिषा कायंदे जोड

मनिषा कायंदे जोड

Published on

एक दिवस बोलणाऱ्यांचा कचरा होईल!
ठाकरे गटाच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा टोला
ठाणे, ता. १८ ः कचरा हा आता टाकाऊ राहिलेला नाही. त्यातून ऊर्जानिर्मिती होते. त्यामुळे एक दिवस बोलणाऱ्यांचाच कचरा होईल, असा टोला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर दिले. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीची स्क्रीप्ट वाचून दाखवली जाईल, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचा १९ जून रोजी वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आज वरळीमध्ये राज्यव्यापी पदाधिकारी शिबिर घेतले. मात्र त्याआधीच शिवसेना प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे नॉट रिचेबल झाल्या. त्या शिंदे गटात जाणार हे कळल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांचा उल्लेख कचरा असा केला. त्याला एकनाथ शिंदे यांनी कायंदे यांच्या पक्षप्रवेशावेळी प्रत्युत्तर दिले. राम मंदिर बांधण्याचे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. ते पूर्ण करणाऱ्यांवर तुम्ही टीका करत आहात आणि ज्यांनी विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. गेले काही दिवस कोविड काळात ठाकरे सरकारने केलेल्या कामाचा गाजावाजा केला जात आहे. त्याचा समाचारही मुख्यमंत्र्यांनी घेतला. ‘कोविडचा मुद्दा सारखा उपस्थित करण्यात येत आहे; पण प्रत्यक्ष फिल्डवर कोण होते, हे साऱ्या जगाने पाहिले होते. अशा परिस्थितीत रुग्णांना भेटण्याचे, औषधे आणि ऑक्सिजन देण्याचे काम कोणी केले हे सर्वांना माहीत आहे. केवळ फेसबुक लाईव्ह करून कोविड आटोक्यात येत नसतो,’ असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले, की जनता सुज्ञ आहे. ११ महिन्यांपूवीं सरकार स्थापन झाले. तीन वर्षांत झाली नाहीत ती कामे या आपल्या सरकारमध्ये पूर्ण होत आहेत. हे शिवसेना-भाजप सरकार जनतेचे आहे. येथे वैयक्तिक नव्हे; तर सर्वसामान्य जनेचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.