Education: शिक्षणाचा बाजार! एका शिक्षकावर १३३ विद्यार्थ्यांचा भार; शिकवण्यासाठी शिक्षकाची तारेवरची कसरत

Education
Educationesakal
Published on

मनोर, ता. २७ (बातमीदार) : जिल्हा परिषदेच्या मनोर येथील उर्दू माध्यमाच्या शाळेत १३३ पटसंख्या आहे; मात्र या शाळेत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकाला मोठी कसरत करावी लागत आहे.

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तातडीने नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी पंचायत समितीकडे केली आहे.

Education
Medical Postgraduate Admissions : वैद्यकीय पदव्‍युत्तर प्रवेशाच्‍या परीक्षा अर्जाची 24 जूनपर्यंत मुदत

मनोर जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात १३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

३५ विद्यार्थ्यांच्या संख्येसाठी एक शिक्षक नेमला जात असल्याने १३३ विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार किमान तीन शिक्षकांची नियुक्ती केली पाहिजे. नवीन शैक्षणिक वर्षात होणारा शाळा प्रवेश सोहळा, अन्य कामांसोबत १३३ विद्यार्थ्यांना शिकवण्याची तारेवरची कसरत एक शिक्षक करत आहे.

मनोरच्या उर्दू शाळेत नेमणूक असलेली शिक्षिका सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून टेन गावातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या शिक्षकाची तात्पुरती नेमणूक मनोरच्या शाळेत करण्यात आली आहे.

Education
Medical Admission: वैद्यकीय प्रवेश झाला कठीण! डॉक्टर होण्यासाठी आता 'नीट टू नेक्स्ट' परीक्षा

१३३ विद्यार्थ्यांना एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पटसंख्येनुसार किमान तीन शिक्षकांची नेमणूक तत्काळ स्वरूपात करण्याची मागणी केली जात आहे.

मनोरच्या उर्दू शाळेतील १३३ विद्यार्थ्यांसाठी एका शिक्षकामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोयीसोबत शैक्षणिक नुकसान होत आहे. पटसंख्येनुसार तीन शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.
- कैफ रईस, माजी उपसरपंच, मनोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com