Mumbai
MumbaiSakal

Mumbai : माळशेज घाट पर्यटकांनी फुलला

पावसाळ्यात माळशेज घाटात निसर्गाची मुक्त उधळण पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी होत असते.

Mumabi - पावसाने जोरदार हजेरी लावल्याने माळशेज घाटातील धबधबे ओसडून वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची पाऊले माळशेज घाटाकडे वळू लागली आहेत. पावसाळ्यात माळशेज घाटात निसर्गाची मुक्त उधळण पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी होत असते. घाटातील धबधबे ओसडून वाहू लागले की पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. शनिवार रविवारी सुटीच्या दिवसात हजारो पर्यटक हजेरी येथे हजेरी लावतात.

Mumbai
Tur Bajar Bhav : शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा संपली! तुरीला दहा हजार रुपये भाव

उन पावसाचा खेळ व अचानकपणे धुक्याची लाट येण्याचा क्षण कँमेरात टिपण्यासाठी मुंबई, ठाणे,कल्याण, बदलापूर, डोंबिवली, शहापुर, मुरबाड याचबरोबर पुणे व रायगड जिल्ह्यातून पर्यटक येत असतात.त्यामुळे रविवारी पहाटेपासूनच माळशेज घाटात जाणारा रस्ता गाड्यांनी फुलून गेला होता.

Mumbai
Mumbai Parking Issue : सावित्रीबाई फुले नाट्यगृह आवारात दुचाकीस नो एन्ट्री; गलथान व्यवस्थापनाचा रसिकांना फटका

कल्याण -नगर या राष्ट्रीय महामार्गावरील छोटे-मोठे धाब्यांबरोबर हाँटेल मालक पर्यटकांच्या आगमनासाठी सज्ज झाले होते. गरमागरम मक्यांची कणसे, कांदाभजी व त्याचबरोबर वाफाळणारा चहा विकणाऱ्यांच्या टपऱ्याही पर्यटकांना खुणवू लागल्या आहेत.

मुख्य रस्त्यावरच धबधबे ओसडून वाहात असल्याने जणू पर्यटकांचे थवे रस्त्यावरच उतरले होते. मात्र वाहतूककोंडी होत असल्याने चालकांना तारेवरची कसरत करीत मार्ग काढावा लागला.

मद्यपींवर करडी नजर
माळशेज घाटात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी टोकावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्णे येथे चेक नाका सुरू करण्यात आला आहे. नाक्यावर पोलीसांची करडी नजर आहे. प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. यामुळे मद्यप्राशन करून जाणा-या पर्यटकांना चांगलाच वचक बसला आहे.

Mumbai
Mumbai Parking Issue : सावित्रीबाई फुले नाट्यगृह आवारात दुचाकीस नो एन्ट्री; गलथान व्यवस्थापनाचा रसिकांना फटका

कसे जाल माळशेज घाटात ?
माळजेच घाटात जाण्यासाठी कल्याण, मुरबाडहून एस टी. बसने जावू शकता. तसेच कल्याण,मुरबाड या मार्गे कल्याण-नगर या महामार्गावरून थेट माळशेज घाटात जाऊ शकता.

माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांनी आनंद लुटावा. मात्र आनंद लुटत असताना कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यटकांनी आपली वाहाने रस्त्यालगत वेडीवाकडी उभी करू नयेत. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच सूचनांचे पालन करा.

-सचिन कुलकर्णी , सहाय्यक पोलीस निरीक्षक, टोकावडे पो.ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com