वांद्र्यातील जागेत म्हाडा उभारणार व्यावसायिक संकुल

वांद्र्यातील जागेत म्हाडा उभारणार व्यावसायिक संकुल

Published on

मुंबई, ता. ३ : वांद्रे पश्चिमेतील तब्बल तीन हेक्टर जागेवर म्हाडा व्यवसाय संकुल उभारणार आहे. संबंधित जागा वांद्र्यातील मोक्याच्या ठिकाणी असल्याने म्हाडाकडून तिचा विकास करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्गालगत म्हाडाचा तब्बल ३० हजार चौ. मी.चा भूखंड आहे. त्यावर अतिक्रमण झाले असल्याने आता त्याचा विकास करण्यापूर्वी झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत योजना राबवून तेथील झोपडीधारकांना हटवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी तिथे गृहनिर्मिती करण्यात येणार असल्याची चर्चा होती; परंतु व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाने दिली. म्हाडाच्या मुंबई आणि उपनगरांतील अनेक भूखंडांवर झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण केले आहे; मात्र मुंबईतील जागांची कमतरता लक्षात घेता म्हाडा अशा ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवून त्यांचा विकास करणार आहे. असा विकास करत असताना आवश्यक तिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यात येईल.

जागा मोक्याच्या ठिकाणी
वांद्रे पश्चिमेतील अग्निशमन केंद्रासमोरील जागेत व्यावसायिक संकुल उभारण्यासाठी म्हाडा झोपु योजना राबवणार आहे. संबंधित भूखंड वांद्रे पश्चिम आणि पूर्वला जोडणाऱ्या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असल्याने तिथे व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय झाला असून, त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मिलिंद बोरीकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.