यू.ई.एस. शाळेत ‘ग्रँड पॅरेन्ट डे’ उत्साहात साजरा

यू.ई.एस. शाळेत ‘ग्रँड पॅरेन्ट डे’ उत्साहात साजरा

Published on

उरण, ता. ३ : यू.ई.एस. स्कूल ॲण्ड कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवारी (ता. ३) ‘ग्रँडपॅरेन्ट डे’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रकाश पाटील, प्रविता पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या मीनाक्षी गुप्ता, स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, कॉलेजच्या एचओडी तसेच पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका, आजी आजोबा व त्यांची नातवंडे उपस्थित होते. पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिकेने; तसेच प्रकाश पाटील आणि मिलिंद पाडगांवकर यांनी या वेळी आपले मनोगत मांडले. सर्वांनी मनोगतातून आजी-आजोबांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व या विषयावर मत व्यक्त करून आजी-आजोबांप्रति आदर व्यक्त केला. या वेळी आजी-आजोबांसाठी मनोरंजक खेळाचे आयोजन केले होते, ज्याचा आनंद त्यांनी मनमुराद लुटला. खेळात विजयी झालेल्यांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.