वेश्‍या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक

वेश्‍या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक

Published on

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : दोन तरुणींना पैशांचे प्रलोभन दाखवून वेश्‍या व्यवसाय चालवणाऱ्या एका दलाल महिलेसह रिक्षाचालकास मंगळवारी रात्री ठाणे गुन्हे शाखेने सापळा रचून भिवंडीत बेड्या ठोकल्या आहेत. बुलबुलबानो हमीद खान (२४, रा. मिरा रोड ईस्ट) व रिक्षाचालक सुरेंद्र बाडो यादव (३१, रा. भाईंदर पश्चिम) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.

आरोपींनी पीडित २१ व २४ वर्षीय दोन तरुणींना पैशांचे प्रलोभन दाखवून वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पाडले. भिवंडी-कल्याण बायपास येथील सॉलिटीयर रेसिडेन्सी या लॉजिंग बोर्डिंगमध्ये शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ग्राहकांसोबत पाठवत असत. या घटनेची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखेने सॉलिटीयर लॉज परिसरात सापळा रचून बुलबुलबानो आणि सुरेंद्रला ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास अस्लेशा घाटगे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.