सार्वजनिक शौचालयाच्या छताचे प्लास्टर कोसळले

सार्वजनिक शौचालयाच्या छताचे प्लास्टर कोसळले

Published on

ठाणे, ता. ६ (बातमीदार) : शहरातील खोपट भागात प्रताप टॉकीजजवळ महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना घडली आहे. दोन मजली असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या रुमच्या छताचे प्लास्टर कोसळले. या घटनेत दोन मुली जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

या घटनेत गौरी गायकवाड (१३) हिच्या डोक्याला आणि शिखा कारतीया (१७) हिच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. हे शौचालय दहा वर्षे जुने असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, उथळसर प्रभाग समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकापट्टी बांधण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. ही आठवड्याभरातील दुसरी घटना असून पहिली घटना उथळसर भागात रविवारी घडली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.