शहापूरवासीयांना आता मिळणार शुद्ध पाणी

शहापूरवासीयांना आता मिळणार शुद्ध पाणी

Published on

शहापूर, ता. ६ (बातमीदार) : शहापूरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शहापूरचा पाणीप्रश्‍न सुटणार आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या कोट्यातून नगरविकास विभागाकडून प्रभाग क्रमांक ७ मध्ये नवीन ९ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याच्या टाकीसाठी नगरसेवक हरेश रघुनाथ पष्टे यांनी प्रयत्न केले होते. अखेर आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक ७ मध्ये नवीन ९ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्रासाठी मागणी केली होती. याबाबत केंद्रीय पंचायतराज राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राच्या अनुषंगाने पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र असलेल्या प्रभागातील नगरसेवक हरेश रघुनाथ पष्टे यांनी मंत्रालयात पाठपुरावा केला होता. अखेर प्रभाग क्रमांक ७ मध्ये नवीन पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात यश आले.

या कामाची प्रशासकीय मान्यता नगरविकास विभागाकडून देण्यात आली आहे, नगरपंचायतीमार्फत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला ४ जुलै रोजी अंतिम मान्यता मिळाली आहे. या कामासाठी ३ कोटी ५० लाख रक्कम नगरविकास विभागाकडून नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात आली आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या शुद्धीकरण केंद्रासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार किसन कथोरे, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शहर प्रमुख/गटनेते विवेक नार्वेकर, हरेश रघुनाथ पष्टे, नगरसेवक आनंद, भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी/कार्यकर्ते यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.