पाणीमीटर चोरांवर पोलिसांची कारवाई

पाणीमीटर चोरांवर पोलिसांची कारवाई
Published on

पाणीमीटर चोरांवर पोलिसांची कारवाई
नवीन पनवेल, ता. ६ (वार्ताहर)ः कळंबोली वसाहतीमध्ये दोनशेपेक्षा अधिक पाणी मीटर चोरीस गेल्याच्या तक्रारी सिडको मंडळाच्या पाणीपुरवठा विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार कळंबोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिस तपासात या चोरीचा छडा लावण्यात यश आले असून ५४ पाणीमीटर जप्त करण्यात आले आहेत.
सिडको महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाने तीन वर्षांपूर्वी कळंबोली आणि नवीन पनवेल येथे लाखो रुपये खर्च करून पाणी मीटर लावून दिले होती. सिडको मंडळाने स्वखर्चाने घरमालक किंवा गृहनिर्माण सोसायटीला हे मीटर बसवून दिले होते. अशातच गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत पाणी मीटर चोरीचे प्रकार वाढल्याने नागरिक वैतागले होते. अखेर पोलिसांनी मीटर चोरांचा शोध लावला असून या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांसह भंगार विक्रेता कन्हैया गुप्ता (वय ३५) याला पनवेल येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५४ पाणी मीटर ताब्यात घेतले असून या प्रकरणात दोघे जण फरारी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.