बांधकाम व्यावसायिकाकडून शेतकऱ्याची फसवणूक

बांधकाम व्यावसायिकाकडून शेतकऱ्याची फसवणूक

Published on

नवी मुंबई (वार्ताहर) : साडेबारा टक्के योजनेंतर्गत खारघरमधील सिडकोच्या भूखंडावरील बांधलेल्या इमारतीमधील काही फ्लॅट परस्पर दुसऱ्यांना विक्री, तसेच गहाण ठेवून एका शेतकऱ्याची तब्बल १ कोटी ६२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक सुलतान सिराजुद्दीन यासीन व त्याचा साथीदार वसंत शामलाल अग्रवाल याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
खारघर गावात राहणारे संतोष पाटील (५२) यांची वडिलोपार्जित जमीन सिडकोने संपादित केली होती. २००७ मध्ये सिडकोने त्यांच्या कुटुंबीयांना साडेबारा टक्के योजनेंतर्गत १७०० चौ. मीटरचा भूखंड दिला होता. हा भूखंड पाटील कुटुंबीयांनी बांधकाम व्यावसायिक सुलतान सिराजुद्दीन यासीन याला विकसित करण्यासाठी दिला होता. त्यावेळी पाटील कुटुंबीयांना मिळालेल्या जागेवर उभ्या राहणाऱ्या इमारतीत ५०० चौ.मीटर बांधकाम हिस्सा पाटील यांच्या कुटुंबाला देण्याचे, तसेच बांधकामासाठी लागणारा सर्व खर्च बांधकाम व्यावसायिक करणार असल्याचे ठरले होते. त्यानुसार ५ मार्च २००९ मध्ये पांडुरंग पाटील आणि सुलतान सिराजुद्दीन यासीन, त्याचा साथीदार वसंत अग्रवाल यांच्यात व्यवहार झाला. अशातच सुलतान सिराजुद्दीन यांना खारघर सेक्टर-१० मधील १२ माळ्यांची इमारत बांधण्याची परवानगी असताना सुलतान सिराजुद्दीन याने १७ माळ्यांची इमारत उभारली होती. त्यामुळे सिडकोने या इमारतीला ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) दिली नाही. तसेच २०१७ मध्ये इमारतीमधील पाटील कुटुंबीयांना दिलेल्या फ्लॅटवर बँकेचे कर्ज भरले नसल्याबाबत बँकेने नोटिसा पाठविल्यानंतर सुलतान सिराजुद्दीन याने काही फ्लॅट परस्पर दुसऱ्यांना विक्री केल्याचे, तसेच काही फ्लॅट बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतल्याची माहिती मिळाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.