फुटबॉल प्रशिक्षकाला दुक्कलीची मारहाण

फुटबॉल प्रशिक्षकाला दुक्कलीची मारहाण

Published on

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : दुचाकीला कट मारल्याचा बहाणा करून दोघा लुटारूंनी नेरूळमधील एका फुटबॉल प्रशिक्षकाची कार भररस्त्यात अडवून त्याला बेदम मारहाण केली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर खैरणे येथे ही घटना घडली असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेरूळमध्ये प्रो स्कूल स्पोर्टस इंडिया नामक अकादमीत प्रशिक्षक असलेला रिचर्डसन लोबो (२६) हा तरुण सोमवारी (ता. ३) रात्री १०.३० वाजता अल्टो कारने नेरूळ येथे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी कोपरखैरणे उड्डाण पुलाखाली आला असताना त्याच्या कारच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिचर्डसन यांच्या कारच्या काचेवर जोरात थाप मारून गाडी थांबविली होती. यावेळी रिचर्डसनने त्यांच्या दुचाकीला कट मारल्याच्या रागातून दोघांनी त्याला जबरदस्तीने कारच्या बाहेर खेचत मारहाण करून गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रिचर्डसनने तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.