ज्येष्ठ महिलेच्या अवयवदानामुळे दोघांचे प्राण वाचवण्यात यश

ज्येष्ठ महिलेच्या अवयवदानामुळे दोघांचे प्राण वाचवण्यात यश

Published on

मुंबई, ता. ६ : मुंबईत अवयवदानाचे प्रमाण वाढू लागले आहे. सोमवारी मुंबईला लागून असलेल्या मिरा रोडमधील एका खासगी रुग्णालयात यंदाच्या वर्षातील २३ वे यशस्वी अवयवदान झाले. एका ब्रेनडेड वृद्ध महिलेच्या मूत्रपिंड दानामुळे दोन जीव वाचवण्यात यश आले.
‘झेडटीसीसी’ समन्वयक संगीता देसाई यांनी सांगितले, की ३ जुलै रोजी एका खासगी रुग्णालयात वृद्ध महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. नातेवाईकांच्या संमतीनंतर तिचे मूत्रपिंड इतर रुग्णांना दान करण्यात आले. गेल्या वर्षी २०२२ मध्ये राज्यात १०३ जणांनी अवयवदान केले होते. अवयवदानाच्या बाबतीत पुणे आणि मुंबई विभागीय समित्यांनी गेल्या वर्षभरात मोठे योगदान दिले आहे. राज्य अवयव आणि स्टेम सेल प्रत्यारोपण संस्थेच्या संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले, की गेली दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्याने कमी अवयवदान करण्यात आले. कोरोनाच्या आधी अवयवदानाची संख्या जास्त होती. येत्या काळात ती नक्कीच वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अवयवदानाची संख्या वाढावी यासाठी सर्व विभागीय समित्या प्रयत्नशील आहेत. अवयवदानाची गरज लक्षात घेऊन त्याची संख्या वाढवणे नक्कीच गरजेचे आहे, असेही सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.