डहाणूत पुन्हा भूकंपाचा धक्का

डहाणूत पुन्हा भूकंपाचा धक्का

Published on

कासा, ता. ६ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्‍य धक्का जाणवल्याचे स्‍थानिकांकडून सांगण्यात आले. बुधवारी रात्री साडेदहा वाजता हा धक्‍का जाणवला. यामुळे ग्रामस्‍थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्याला भूकंपाचा धक्‍का जाणवला नव्हता. मात्र एकीकडे जोरदार पावसाला सुरुवात झाली असून भूकंपाचे धक्के सुरू झाल्याचे ग्रामस्‍थांकडून सांगण्यात येत आहे. डहाणू, तलासरी तालुक्यातील अनेक गावांत हा धक्का जाणवला. यावेळी २.३ रिश्टर स्केलची नोंद झाली असल्याची माहिती डहाणू तालुका तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी दिली. यामुळे शासनाकडून याची सखोल चौकशी होऊन भविष्यात एखादी दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आपत्‍कालीन विभाग सज्ज ठेवला पाहिजे, असे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.