हद्दपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

हद्दपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Published on

ठाणे, ता. ६ (वार्ताहर) : ठाणे, मुंबई उपनगरे हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीस मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिस पथकाने बुधवारी (ता. ५) सायंकाळी अटक केली. रोहित शंकर सोनकांबळे (वय २५, रा. सिध्दार्थनगर, कोपरी, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई असतानादेखील मनाई आदेशाचे उल्लंघन करून सिडको बस स्टॉप येथे रोहित सोनकांबळे आढळून आला. ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिस पथकाने त्यास अटक केली. त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.