एसी रेल्वेत आता पर्यावरणपूरक पिशव्या!

एसी रेल्वेत आता पर्यावरणपूरक पिशव्या!

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : मध्य रेल्वेने एका खासगी कंपनीच्या सहकार्याने वातानुकूलित रेल्वे डब्यामधील प्रवाशांना बेडशिट आणि हॅण्ड टॉवेलसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक कागदी पिशव्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याऐवजी इको-फ्रेंडली, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या देण्यात येत आहेत. या कागदी पिशव्या खरेदीवर वार्षिक १.५ कोटी रुपयांचा होणारा खर्च आता वाचणार आहे.

पारंपरिक तपकिरी क्राफ्ट पेपर बॅगचा वापर भारतीय रेल्वेसाठी खर्चिक पडत आहे. तथापि, या पिशव्या काढल्यानंतर अनेकदा फाटतात, त्यामुळे कप्प्यात कचरा होतो. एका खासगी कंपनीने पारंपरिक कागदी पिशव्यांचा वापर बंद करण्याचे सुचवले आणि त्यामुळे त्यांच्या उत्पादनासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण कमी करावे आणि त्याऐवजी प्रवाशांना प्रवासानंतर घरी घेऊन जाणाऱ्या पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या देण्याचा प्रस्ताव रेल्वेला दिला. या पिशव्या पारंपरिक क्राफ्ट कव्हर्सपेक्षा महाग असल्या, तरी पुरवठादाराने त्या मध्य रेल्वेला मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात पुरवठादाराकडून पिशव्यांवर जाहिरात करण्यात येणार आहे.

गुडी बॅगमध्ये लिनेन चादरी
१) मध्य रेल्वेने पर्यावरणपूरक पिशव्यांचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला. सुरुवातीला मुंबईहून सुटणाऱ्या एक्स्प्रेसवर मे. आधार कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे मध्य रेल्वेला दरवर्षी सुमारे एक कोटी बॅग पुरवण्यात आल्या. यामुळे पूर्वी कागदी पिशव्या खरेदीवर होणारा वार्षिक १.५ कोटी रुपयांचा खर्च वाचला आहे.
२) रेल्वे प्रवाशांना आता गुडी बॅगमध्ये लिनेन चादरी मिळत आहेत. परवानाधारक पुरवठादार प्रत्येक वर्षी मध्य रेल्वेला एक कोटी लिनेन कव्हर पुरवणार आहे. ज्यामुळे या पाच वर्षांच्या कालावधीत रेल्वेची ७.५ कोटी रुपयांची बचत होईल. तसेच पुरवठादाराला विविध संस्थांकडून जाहिरातीही मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.