आरआयआयजी प्रतिनिधींचा आयआयटी दौरा

आरआयआयजी प्रतिनिधींचा आयआयटी दौरा

मुंबई, ता. ६ : ‘रिसर्च अँड इनोव्हेशन इनिशिएटिव्ह गॅदरिंग समिट’ (आरआयआयजी) आणि भारताच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज ‘जी-२०’ संशोधन मंत्र्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर जी-२० प्रतिनिधींनी आयआयटी मुंबईला भेट देऊन संशोधन आणि नावीन्यपूर्ण सुविधांचा आढावा घेतला. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. एस. सुदर्शन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव (डीएसटी) डॉ. श्रीवरी चंद्रशेखर यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले.

सुदर्शन यांनी आयआयटीच्या कार्याचे सादरीकरण केले. प्रा. उपेंद्र भांडारकर यांनी संशोधन आणि विकास व्यवस्थेबद्दल आणि प्रा. असीम तिवारी यांनी आयआयटी मुंबईतील उद्योजकता आणि नवोन्मेषपूरक वातावरणाची माहिती दिली. तत्पूर्वी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. जगासमोरील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी विधायक आणि फलदायी चर्चा केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी ‘जी-२०’ देशांचे आभार मानले. यामध्ये २९ सदस्यांच्या संशोधन मंत्र्यांसह सुमारे १०० विदेशी प्रतिनिधी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com