खासगी इमारती धोकादायक करुन रहिवाशांना बेघर करण्याचा डाव

खासगी इमारती धोकादायक करुन रहिवाशांना बेघर करण्याचा डाव

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे महापालिका हद्दीत खासगी इमारती या राहण्यास योग्य असतानाही त्या धोकादायक ठरवून तेथील भाडेकरू; तसेच घरमालकांना बेघर करण्याचे काम महापालिकेतील काही अधिकारी आणि विकसक करीत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी केला आहे. ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही बाब उघडकीस आणली. तसेच भाडेकरूंची व घरमालकांची कशी फसवणूक केली जाते, याचे पुरावेदेखील सादर केले. खासगी मालकीचे भूखंड असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई होतेच कशी, असा सवालही संजय घाडीगावकर यांनी केला.
नौपाडा, उथळसर, कोपरी हे विभाग मूळ ठाणे शहराच्या नगरपरिषदेच्या हद्दीत येतात, या ठिकाणी जुन्या चाळी आणि इमारती आहेत. त्यात राहणारे घरमालक व भाडेकरू हे कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत; परंतु काही कारणास्तव त्यांच्यात वाद सुरू आहेत. अशा खासगी मिळकतीवरील धोकादायक इमारती ठरवून त्यासाठी प्रभाग समितीचे सहायक आयुक्त, उपायुक्त दबाव टाकून त्या इमारती धोकादायक करण्यासाठी रहिवाशांवर दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे भाडेकरांच्या व सदनिका धारकांच्या हक्काच्या पुनर्वसन सदनिका महापालिकेने मंजूर केलेल्या इमारत नकाशावर रेखांकित करून व त्या भाडेकरू- सदनिकाधारकांचे नाव मंजूर इमारत नकाशांच्या प्रतींवर नोंदवून सुधारित इमारत नकाशे ठामपात दाखल करण्याचे आदेश वास्तुविशारदांना ठामपाने द्यावेत, तशा सुधारणा इमारत नकाशा व बांधकाम प्रमाणपत्रावर भाडेकरू व सदनिकाधारकांच्या नावासह करण्यात याव्यात, अशा सूचना शहर विकास विभागाचे उपनगर अभियंता व सर्व कार्यकारी अभियंता यांना देण्यात याव्यात, अशी मागणही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.