शिक्षिकेने स्टीलच्या पट्टीने विद्यार्थ्यांना बदडले

शिक्षिकेने स्टीलच्या पट्टीने विद्यार्थ्यांना बदडले

Published on

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : विद्यार्थ्यांची फी साडेचार हजार रुपयांवरून तब्बल १५ हजार रुपये करणाऱ्या उल्हासनगरातील न्यू इंग्लिश शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना स्टीलच्या पट्टीने बदडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी न्यू इंग्लिश शाळेने विद्यार्थ्यांची फी साडेचार हजार रुपयांवरून १५ हजार रुपये केली. पालकांनी याचा जाब विचारला असता, नवीन सामान आणि शिक्षक घेतल्याचे कारण सांगून पालकांना परतवून लावले होते. अशात बुधवारी शाळेने दिलेला फार्म भरून आणला नाही, म्हणून कौशल गुप्ता (१०), नेहालसिंग लबाना (१२) आणि काही विद्यार्थ्यांना स्टीलच्या पट्टीने बदडून क्लास संपेपर्यंत बाकावर उभे केले. हा प्रकार पालकांना कळताच त्यांनी गुरुवारी हिललाईन पोलिस ठाण्यात धाव घेतली. आमदार गणपत गायकवाड यांचे कट्टर समर्थक नीलेश बोबडे, सुनील तांबेकर, स्नेहल राणे, भावेश टोळ, तितर वर्णी, गणपत तांबे, गौरव भंडारी यांनी पोलिस ठाणे गाठल्यावर सागर गुप्ता या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून दिशा ठारवानी आणि मराठी माध्यमाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.