सांताक्रूझमधील सात मजली इमारतीत आग...ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

सांताक्रूझमधील सात मजली इमारतीत आग...ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Published on

इमारतीला आग; वृद्धाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : ‘ट्राइड ऑफ कलिना’ या सात मजली इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्‍याची घटना शुक्रवारी मध्यरात्री सांताक्रूझ पूर्वेत घडली. नगीन लखू पटेल (८५) असे मृताचे नाव आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणून बचावकार्य सुरू केले. पटेल हे या घटनेत गंभीर जखमी झाले होते. त्यांना व्‍ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.