कशेडीत चार वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू

कशेडीत चार वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू

पोलादपूर, ता. ८ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्ग पोलिस केंद्राच्या कशेडी हद्दीत चार वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ७) रात्री नऊच्या सुमारास घडली. दत्तात्रय शरद टेके (४२, रा. माळेगाव-बारामती) असे मृताचे नाव आहे.

कशेडी टॅपपासून दोन किलोमीटर अंतरावर बारामतीहून दापोलीला कारने जाणाऱ्या कैलास वनवे यांच्या कारला (एमएच ४२ बीई ४४४९) मागून येणाऱ्या टँकरने (डीडी ०१ जे ९६६०) ठोकर दिल्याने ही कार रस्त्याच्या डाव्या बाजूस नाल्यामध्ये गेली. त्याचवेळी बारामतीहून दापोलीला कारने (एमएच १२ आरवाय ८८८८) जाणारे सुयोग कुलकर्णी हे त्याच टँकरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून मुंबई दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एपी ०२ टीई ४८५८) धडकले. या अपघातात दत्तात्रय टेके यांना जखमी अवस्थेत पोलादपूर ग्रामीण रुग्णालय दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, पोलिस निरीक्षक युवराज म्हसकर, पीएसआय उदय धुमास्कर, हवालदार कदम आदींनी रुग्णालयात धाव घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com