सीवूड्समध्ये मनसेमार्फत ‘एक सही संतापा’ची अभियान

सीवूड्समध्ये मनसेमार्फत ‘एक सही संतापा’ची अभियान

Published on

नेरूळ, ता.१० (बातमीदार) : सध्याच्या राजकीय परिस्थिती विरोधात मनसेने एक सही संतापाची मोहीम राबविली असून रविवारी सीवूड सेक्टर ४८ येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक, महिला, तरुणांसोबत स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला. ज्येष्ठ नागरिकांनी ६० ते ७० वर्ष महाराष्ट्राचे राजकारण बघितले आहे. आणि सध्याच्या पिढीला सुरू असलेले राजकारण बिलकुल आवडत नसल्याने त्यांनी मोकळेपणाने आपला राग यावेळी व्यक्त केला. एका ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांने या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत, सध्याचे राजकारण बाजार झाले आहे, आपण आपली ताकद दाखवली पाहिजे, अशी प्रतिक्रिया नोंदवली. एक सही संतापाची हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा अध्यक्ष दिलीप पाटील, शाखा अध्यक्ष संतोष टेकवडे, शंकर घोंगडे-पाटील, रामचंद्र कोकरे यांनी विशेष सहकार्य केले. यापुर्वी शनिवारी संध्याकाळी मनसे शहर सचिव सचिन कदम, स्वप्निल भागवत, जनहित कक्ष उपशहर अध्यक्ष अंकुश सानप, मनसे विभाग अध्यक्ष नरहरी कुंभार यांनीही मोहीम राबविली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.