गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप

Published on

पेण, ता. १० (वार्ताहर) : स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सुभाष टेंबे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा प्राथमिक शाळा आंबेघर येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप केले. पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत येणारी मुले ही गरीब कुटुंबातून येत असून त्यांना शाळेची व अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी मागील अनेक वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवित असल्याचे सुभाष टेंबे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला शेतकरी कुक्कुटपालन संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल खामकर, स्वराज्य प्रतिष्ठान सल्लागार पंढरी रुपकर, सुधीर गुडेकर, बळीराम पाटील, प्रकाश तेटमे, लक्ष्मण जगताप, प्रतिभा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली चौधरी, शिक्षक संतोष सानप आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.