पूर्व उपनगरात रस्‍ते दुरुस्‍तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

पूर्व उपनगरात रस्‍ते दुरुस्‍तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

पूर्व उपनगरात रस्‍तेदुरुस्‍तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः पूर्व उपनगरातील कुर्ला ते मुलुंड भागातील सर्व रस्त्यांवरील खड्डे आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने भरले जात आहेत. त्यामुळे ऐनपावसाळ्यातही रस्ते कायमस्वरूपी चकाचक राहणार असल्‍याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. महिनाभरापूर्वी पालिकेच्या एन विभाग कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून संजय सोनवणे यांनी पदभार सांभाळला होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली आता पूर्व उपनगरातील हे खड्डे भरले जात आहेत.
पालिकेच्या रस्ते विभागाच्या वतीने कुर्ला एलबीएस मार्ग, घाटकोपर येथील रस्ते, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. हे खड्डे सध्या पूर्वीसारखे केवळ सिमेंट अथवा खडी तसेच डांबर टाकून नाही, तर रिॲक्टिव अस्फाल्ट रॅपिड हार्डनिंग काँक्रिट करून भरले जात आहेत. तसेच त्यासाठी मस्टिक कोल्डमिक्स या आधुनिक साधनांचाही वापर केला जात आहे. त्यामुळे हे खड्डे कितीही पाऊस पडला तरी घट्ट राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे. रस्‍त्‍याच्या रुंदीनुसार यातील कोणते आणि किती साहित्य वापरावे लागेल याबाबत पालिकेने एक निश्चित नियम केल्याचेही या वेळी सांगण्यात आले आहे.
रस्ते विभागाचे पूर्व उपनगर उपप्रुमख अभियंता संजय सोनावणे तसेच त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, दुय्यम अभियंता आणि कंत्राटदारांचे इंजिनिअर हे अहोरात्र खड्डे बुजवण्याचे काम करत आहेत. त्यात एएमसी पी वेलरासू, उपायुक्त महाले, प्रमुख अभियंता पटेल, कार्यकारी अभियंता मोदी, जगदाळे हेही जातीने स्वतः लक्ष देत आहेत.

पुन्हा खड्डे पडणार नाहीत
पूर्व उपनगरातील कुर्ला ते मुलुंडदरम्यानच्या रस्त्यांवरील जे खड्डे सध्या भरण्यात येत आहेत, ते या नवीन आधुनिक पद्धतीने पूर्ण केले जात असल्याने त्या जागी पुन्हा खड्डे पडणार नाहीत, अशी माहिती पालिकेचे रस्ते विभागाचे पूर्व उपनगर उपप्रमुख अभियंता संजय सोनावणे यांनी दिली. ऐन पावसाळ्यात वाहने आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही युद्धपातळीवर खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. हे नवीन तंत्रज्ञान पद्धतीचे असून, हे खड्डे पुन्हा उखडले जाणार नाहीत. ही पद्धत यापूर्वी वापरात नव्हती; मात्र गेल्या वर्षी याबाबत एक चाचणी घेतल्यानंतर या वेळी ही आधुनिक पद्धत कार्यरत करण्यात आली आहे. यामुळे हे खड्डे आता दगडासारखे कठीण होणार आहेत, असे उपप्रमुख अभियंता रस्ते विभाग संजय सोनवणे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com