अर्जिया सय्यदचे सीए व्हायचे स्वप्न पूर्ण

अर्जिया सय्यदचे सीए व्हायचे स्वप्न पूर्ण

Published on

रोहा, ता. ९ (बातमीदार) ः येथील अर्जिया सय्यदने अवघड समजली जाणारी सीएची परीक्षा पास केली आहे. तालुक्यातील आंबेवाडी-कोलाड नाका येथे वास्तव्यास असणारी अर्जिया हिने शालेय जीवनापासून अनेक परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. शालेय उपक्रम, स्पर्धा यामध्ये ती नेहमीच आघाडीवर होती. तिने शालेय व कॉलेजचे शिक्षण द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कोलाड येथे पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथे बीकॉम व एलएलबीचे शिक्षण घेऊन पुढे सीएची परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी ती पास झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.