फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका

फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका

Published on

कल्याण, ता. १० (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वेस्थानकादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. त्यानुसार मागील तीन महिन्यांत धडक कारवाई करत नऊ हजार ३६२ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून २१ लाख एक हजार ४९५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर कारवाईची प्रवाशांकडून मागणी करण्यात येत होती. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेत १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली. त्यानुसार धडक कारवाई करत नऊ हजार ३६२ फुकट्या प्रवाशांकडून २१ लाख एक हजार ४९५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


असा केला दंड वसूल
एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ६९ प्रवाशांवर कारवाई करत २३ हजार ८९० रुपये दंड वसूल केला.
फस्ट क्लासमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४३५ जणांकडून एक लाख ५० हजार ४२५ रुपये दंड वसूल केला आहे.
सामान्य डब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या पाच हजार ५६७ प्रवाशांकडून सुमारे १४ लाख ६२ हजार ७७५ रुपये दंड वसूल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.