मराठी अभंगांवर आधारीत ''किर्तन रंग'' ने रसिक मंत्रमुग्ध

मराठी अभंगांवर आधारीत ''किर्तन रंग'' ने रसिक मंत्रमुग्ध

Published on

वाशी, ता. १० (बातमीदार) : प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना अपेक्षा निरंजन यांचा ‘कीर्तन रंग’ हा मराठी अभंगांवर आधारीत भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. अपेक्षाच्या भावपूर्ण अभिनयाने आणि लालित्यपूर्ण पदन्यासाने रसिकप्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळातर्फे मराठी साहित्य मंदिर सभागृह, वाशी येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वरीतील ओम नमो जी आद्याने करत पुढे संत जनाबाई, नामदेव, तुकाराम, एकनाथ, समर्थ रामदास, नरहरी सोनार अशा अनेक थोर संतांची महती सांगत त्यांच्या अभंगांवर भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण झाले. ‘‘आपल्या आवडीच्या मराठी अभंगांवर आधारीत भरतनाट्यम् नृत्याचा कार्यक्रम प्रथमच पाहायला मिळाला. अपेक्षा निरंजन यांच्या सात्विक आणि भावपूर्ण अभिनयामुळे अभंगांचा मतितार्थ सहज पोहचला तसेच हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात झाला पाहिजे,’’ अशी प्रतिक्रिया रसिक प्रेक्षकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला साथ मिताली हसबनीस यांनी दिली; तर गायनाची साथ यश वारियार, मृदंग सतीश कृष्णमूर्ती आणि सारंगीची साथ संदीप मिश्रा यांनी दिली. या कार्यक्रमास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश प्रदीप देशमुख, सांस्कृत तज्‍ज्ञ डॉ. माधवी नरसाळे आणि मराठी साहित्य, संस्कृती आणि कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.