ॲपल रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी

ॲपल रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी

Published on

वाशी, ता. १० (बातमीदार) : ऐरोली सेक्टर ८ येथील ॲपल रुग्णालयाच्या वतीने विविध आजारांच्या निदानाकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराबरोबरच नोंदणी प्राधान्यानुसार मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि टू डी इको तपासणी मोफत करण्यात येणार आहे. या मोफत शिबिरात विविध तपासण्या करण्यात येणार असून गरजूंनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी (१२ जुलै) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार आहे. मोफत आरोग्य तपासणीमध्ये ईसीजी व हृदयरोग तपासणी, मधुमेह आणि नेत्र तपासणी, बालरोग चिकित्सक डॉ.कोमल ढोबळे यांचे लहान मुलांची चिकित्सा आणि लसीकरणावर समुपदेशन, हाडांची खनिज घनता तपासणी, लठ्ठपणा आणि आहार सल्ला, डायबिटीसच्या अनुषंगाने रक्त शर्करा व डोळ्यांची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये मधुमेह व थायरॉईड तज्ज्ञ डॉक्टर अपर्णा मुळे, फिजिशियन आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर संदीप मुळे, जनरल फिजिशियन आणि सर्जन डॉक्टर धनोज गपाट, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन बोरले, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रवी घुले, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनीष मिराणी, आहार तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया गपाट हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.