कोपरखैरणेची जागृती झाली वैमानिक

कोपरखैरणेची जागृती झाली वैमानिक

Published on

घणसोली, ता. १० (बातमीदार) ः कोपरखैरणे येथील जागृतीने खडतर अशा अभ्यासक्रमात यश मिळवून महिला वैमानिक होण्याचा मान पटकावला आहे. ती नवी मुंबई शहरातून पहिली वैमानिक म्‍हणून सज्‍ज झाली आहे.
जागृती पाटील हिचे लहानपणापासून वैमानिक होण्याचे स्‍वप्‍न होते. त्‍यासाठी ती मध्य प्रदेश येथील गुना प्रशिक्षण केंद्रात दाखल झाली होती. या काळात तीने चार वर्षांचा खडतर असा अभ्यासक्रम यशस्‍वीरीत्‍या पूर्ण केला. दरम्‍या,न कोविडचेदेखील संकट आले होते; मात्र ती डगमगली नाही. या काळात तिने तब्‍बल २० तास विमान चालवले. तसेच आवश्‍यक असलेल्‍या सर्व तांत्रिक परीक्षा पास केल्‍या. महाराष्ट्रातून एकमेव मुलगी म्हणून तिने या प्रशिक्षण संस्थेत सहभाग घेतला होता; तर नवी मुंबई शहरातील पहिली महिला वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करणारी तरुणी ठरली आहे. सुमारे सतरा हजार फूट उंचीवर विमान उडवण्याचे प्रशिक्षण जागृती पाटील हिने घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.