महागाई, बेरोजगारीविरोधात बीआरएसची निदर्शने

महागाई, बेरोजगारीविरोधात बीआरएसची निदर्शने

Published on

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १० : वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या या विरोधात भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस) आक्रमक झाली आहे. सोमवारी बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते हरिभाऊ राठोड आणि दिगंबर विशे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली.
राज्यातील वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदी विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्याकरीता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना येथे बळीराजा असे म्हटले जात आहे. पण सध्या हाच बळीराजा भिकेला लागला आहे. शेतीमालास भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर हाताला रोजगार नसल्याने तरुण वैफल्यग्रस्त होऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत. म्हणूनच आम्ही ‘अब की बार, किसान सरकार’ ही घोषणा दिलेली आहे. महागाईविरोधात जर सरकारने ठोस पाऊल उचलून धोरण आखले नाही तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा हरिभाऊ राठोड यांनी दिला.
सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये दरमहा महागाई भत्ता देण्यात यावा, नाका कामगार तथा असंघटित इमारत कामगार यांचे नाक्या-नाक्यावर सरकारच्या वतीने शिबिर लावून नोंदणी करण्यात यावी. घरेलू कामगारांची शासन आपल्या दारी या मोहिमेंतर्गत नोंदणी करण्यात यावी. ‘उमेद’ अंतर्गत महिला बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या (सीआरपी) मानधनात दहा हजारांची वाढ करण्यात यावी. शहरी भागात टॅक्सी व रिक्षाचालक यांना पाच लाख विमाचे संरक्षण द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.