खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Published on

रोहा, ता. १० (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचा ६८ वा वाढदिवस सोमवारी १० जुलै रोजी मोठ्या उत्साहात व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा झाला. या वेळी त्यांच्यासमवेत मंत्री कन्या आदिती तटकरे, मुलगा आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, राज्य सरचिटणीस विजयराव मोरे आदी उपस्थित होते. या वेळी फोन वरून उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री अमित शहा, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, माजी मंत्री अनिल परब, संजय बनसोडे, रामराजे निबांळकर, रामराजे नाईक, आमदार भरत गोगावले यांनी; तर धनंजय मुंढे, उपसभापती नरहरी झिरवळ, रूपाली चाकणकर आदी प्रमुख मान्यवर तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, ठाणे, पालघर या भागातील हजारो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या; तर ताम्हाणी मार्गे पुणे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा शेकडो गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.