पेणमध्ये रान भाज्‍यांची आवक वाढली

पेणमध्ये रान भाज्‍यांची आवक वाढली

Published on

पेण, ता. १० (बातमीदार) ः गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्‍या खवय्यांना आता रानभाज्‍यांची चव चाखता येणार आहे. पेणमधील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर रानभाज्यांची आवक वाढली आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
लांबलेल्‍या पावसामुळे रानभाज्‍यांनीदेखील उशिरा हजेरी लावली आहे. सध्या पेणच्‍या बाजारपेठेत रानभाज्यांची रेलचेल सुरू झाली आहे. या भाज्या पौष्टिक असून शरीराला आरोग्यदाई असल्यामुळे त्या घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. साधारणपणे टाकळा, भारंग, करटोळी या भाज्यांना वाढती मागणी आहे; तर कुरडू, कुडाच्या शेंगा, शेरू, शिकवा, मोहाटी आदी भाज्याही बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये करटोली ही भाजी अतिशय गुणकारी असून ती मधुमेहाच्‍या रुग्णांसाठी लाभदायक असते. त्‍यामुळे तिला सर्वाधिक मागणी असते. शिवाय, ती महागदेखील विकली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.