एसबीआय बँकेच्या ८० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

एसबीआय बँकेच्या ८० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ८० कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सीबीआयने नुकताच दहिसर येथील ॲल्युमिनियम फॉईलची निर्मिती करणारी कंपनी, संचालक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मुंबईसह गाझियाबाद, हिमाचल प्रदेश येथे सीबीआयने शोधमोहीम राबवली. त्यात संशयित कागदपत्रे, हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले. कंपनीने कर्ज मिळवण्यासाठी आर्थिक नोंदी असलेल्या कागदपत्रांमध्ये बदल करून सादर केले. त्याद्वारे मिळालेली कर्जाची रक्कम इतर ठिकाणी वापरल्याचा आरोप आहे. २००९ ते २०२१ या कालावधीत हा गैरव्यवहार झाला असून त्याबाबत एसबीआयने सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मे. पार्थ फॉईल कंपनीचे संचालक पार्थो विजोय दत्ता व अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.