थोडक्‍यात बातम्‍या

थोडक्‍यात बातम्‍या

Published on

थोडक्‍यात बातम्‍या
बहाई धर्मीयांकडून महात्मा बाब यांना श्रद्धांजली
मुंबादेवी (बातमीदार) : मुंबई चर्चगेट येथील बहाई धर्मीयांच्या बहाई सेंटर येथे सोमवारी १० जुलै रोजी लोककल्याणार्थ आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या महात्मा बाब यांचा १७३ वा बलिदान दिन संपन्न झाला. बहाई धर्मीयांनी महात्मा बाब यांना श्रद्धांजली अर्पण करीत आपले विचार व्यक्त केले. या वेळी उपस्थितांसमोर एडुब्रिज इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता पाचवीत शिकणारी १२ वर्षीय विद्यार्थिनी इवाना मखिझा हिने महात्मा बाब यांच्या संघर्षमय जीवन आणि बलिदानाची माहिती देत श्रद्धांजली अर्पण केली. जगात दया, क्षमा, सुख, शांती आणि संपन्नता नांदावी म्हणून महात्मा बाब यांचे जीवन चरित्र मार्गदर्शक ठरते, असे ती पुढे म्हणाली. बहाई धर्मीयांचे संस्थापक महात्मा बाब यांचा जन्म पर्शियाची राजधानी तेहरान येथे १२ नोव्हेंबर १८१७ साली झाला. बालवयापासून ते शांत, अभ्यासू आणि लोकप्रिय झाले होते. त्यांनी जागतिक प्रेम, शांती आणि समृद्धीसाठी प्रयत्न केले होते.
..........................
मुलुंडमध्ये अखिल भारतीय कराटे चॅम्‍पियनशिप संपन्न
मुलुंड (बातमीदार) ः आर. आर. स्पोर्ट्स अकादमी मुलुंड पूर्व येथे सिहान मुझफ्फर सय्यद यांनी २ री अखिल भारतीय कराटे चॅम्पियनशिप आयोजित केली होती. या स्पर्धेत अशिहरा कराटेचे अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १७ जणांनी सुवर्ण आणि रौप्य पदके तसेच ट्रॉफी जिंकली. या वेळी अशिहरा कराटेचे मुख्य प्रशिक्षक सिहान दयाशंकर पाल उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आर. आर. एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. आर. आर. सिंग, डॉ. बाबुलाल सिंग आणि राजन उंटवाल उपस्थित होते. या वेळी मुलांचे कलागुण पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.
....................
मुलुंड काँग्रेसतर्फे मोफत नोटबुकचे वितरण
मुलुंड (बातमीदार) ः मुलुंड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नीता जोशी आणि राकेश राघवन (जिल्हा अध्यक्ष सहकारी सेल) तसेच सेवक संस्थेच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मुलुंड हायस्कूल हॉल, चंदनबाग रोड येथे आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष चरणसिंग सप्रा उपस्‍थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मुंबई काँग्रेसचे सचिव किशोर मुंडेकल, आयुब सय्यद, महाराष्ट्र काँग्रेसचे उत्तर भारतीय सेलचे सरचिटणीस डॉ. सचिन सिंग, अतुल जोशी, कमल चंदनशिवे, भगवान किशोर तिवारी, कौशल्या गायकवाड, अलका सावला, हरीश गुप्ता, रिझवान आणि करुणानिधी आदींच्या हस्ते नोटबुकचे वाटप करण्यात आले.
.........................
शैक्षणिक साहित्यवाटप करून वाढदिवस साजरा
घाटकोपर (बातमीदार) ः आपली माती आपली माणसं संघटनेचे प्रसिध्दीप्रमुख नीलेश मोरे यांनी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज पार्टे यांच्या हस्ते घाटकोपर पश्चिम साईनाथ नगर रोड येथील ज्ञानसागर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना या वेळी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विजय घाडगे, मारुती जाधव, दत्तात्रय सावंत, अर्चना वाडेकर आदी उपस्थित होते. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शिकले पाहिजे. शिक्षणातून अज्ञान दूर होते आणि आपल्याजवळील अज्ञान दूर करायचा असेल, तर शिक्षण पूर्ण केले पाहिजे, असे संघटनेचे अध्यक्ष राज पार्टे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.