आंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन

आंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन

Published on

मुंबादेवी, ता. ११ (बातमीदार) ः अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी १० जुलै रोजी आझाद मैदानावर हातावर काळ्या फिती लावत अखिल भारतीय मागणी दिवस साजरा केला. या अनोख्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्‍न केला असल्‍याचे सांगण्यात आले. तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार, असेही आंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
गेल्या कित्‍येक महिन्‍यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्‍या विविध मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्‍याने सोमवारी आझाद मैदान येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय मागणी दिवस साजरा केला. या वर्षी हा दिवस आम्ही निषेध दिन म्हणून पाळला, असे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारने २०१८ नंतर मानधनात कोणतीही वाढ केलेली नाही. आहार भत्ता व अंगणवाडीचे भाडे जैसे थे आहे. त्‍यामुळे सरकारचा निषेध म्‍हणून तसेच त्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आल्‍याचे आंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनात सर्व भगिनी काळ्या वेषात सहभागी झाल्या होत्या. तसेच यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपसचिव ठाकूर यांची अंगणवाडी शिष्टमंडळाने भेट घेतली.
चौकट
या वेळी काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या
१. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा.
२. सेविकांना रु. २६ हजार व मदतनिसांना वीस हजार रुपये किमान वेतन मिळावे.
३. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ग्रॅज्‍युईटी लागू करावी.
४. आय.सी.डी.एस.चे खासगीकरण थांबवावे.
५. सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पेन्शन लागू करण्यात यावी.
६. टी.एच.आर.पद्धत रद्द करून लाभार्थ्यांना गरम, ताजा आहार मिळावा.
७. अंगणवाडी केंद्रांचे अटीशर्ती काढून भाडे वाढवून द्यावे. दर महिन्याचे भाडे नियमितपणे द्यावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.