सुरक्षेबाबत महिला प्रवाशांची जनजागृती

सुरक्षेबाबत महिला प्रवाशांची जनजागृती

Published on

वडाळा, ता. ११ (बातमीदार) : लोकलमध्ये प्रवासादरम्यान महिला प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांतर्फे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आज ‘महिला सुरक्षा जनजागृती मोहीम’ राबवण्यात आली. लोहमार्ग मुंबई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे व बाजीराव महाजन यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल येथे राबवलेल्या मोहिमेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण भगत व पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील उपस्थित होते.

महिलांच्या सुरक्षेकरिता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी लोकलमध्ये पोलिसांकडून सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत. महिला प्रवाशांनी महिलांकरिता राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करावा. एकट्याने राखीव डब्यातून प्रवास करताना सुरक्षा कर्मचारी डब्यामध्ये आहे का, याची खात्री करावी, सुरक्षा कर्मचारी नसल्यास प्रवासी असलेल्या डब्यातून प्रवास करावा, रेल्वे स्थानक अथवा रेल्वे प्रवासात कोणत्याही प्रकारची छेडछाडीची घटना होत असल्यास त्याची माहिती तात्काळ कर्तव्यावरील पोलिस अंमलदार अथवा रेल्वे पोलिस हेल्पलाईन क्र. १५१२ यांना कळवावी, लोकलमध्ये चढताना अथवा उतरताना व प्रवासादरम्यान आपला मोबाईल, बॅग व इतर मौल्यवान वस्तूंवर लक्ष द्यावे, अशा जनजागृतीपर सूचना मेघाफोनद्वारे पोलिसांतर्फे देण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.