आठवडी बाजारातील विक्रेत्यांचा बेजबाबदारपणा

आठवडी बाजारातील विक्रेत्यांचा बेजबाबदारपणा

Published on

किन्हवली, ता. ११ (बातमीदार) : शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किन्हवली येथील उपबाजाराच्या संकुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे दर रविवारी भरणारा आठवडे बाजार मुख्य रस्त्यावरच भरत आहे; मात्र येथे दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांनी स्टॉलवरील प्लास्टिक छप्पर बांधण्यासाठी वापरलेले मोठमोठे दगड तसेच रस्त्यावर ठेवले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. स्टॉल उभारण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला लोखंडी पहारीने छिद्र पाडून रस्याची नासधूस केली जात आहे. तसेच रस्त्यावर कचरा फेकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किन्हवली येथील उपबाजाराच्या आवारात संकुलाचे काम दीड वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. दर रविवारी भरणारा आठवडे बाजार किन्हवली-सरळगाव या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भरत आहे. यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, तसेच भाजीपाला किंवा अन्य जिन्नस विक्रते आपल्या तात्पुरत्या स्टॉलवरील प्लास्टिकला दोरीने घट्ट बांधण्यासाठी मोठमोठे दगड वापरतात. बाजार संपल्यावर स्टॉल काढून नेताना ते दगड मात्र रस्त्यावर तसेच ठेवून जातात. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.याबरोबरच सडलेला व खराब झालेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. हा कचरा खाण्यासाठी गुरांची झुंबड उडते, अशा वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

विक्रेते आपले स्टॉल रोवण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या रस्त्यावर खड्डे पाडून रस्त्याची नासधूस करत आहेत. मात्र या सर्व प्रकाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याला सूचना देण्यात येणार असून पुढच्या आठवडी बाजारात असा कुठलाही प्रकार दिसणार नाही. तसेच उपबाजाराच्या आवारात खडी पसरून विक्रेत्यांना बसण्याची तात्पुरती सोय केली जाईल.
- महेश पतंगराव,
संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहापूर
रॉ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.