उद्धव ठाकरेंचे वक्तव्य अशोभनीय!

उद्धव ठाकरेंचे वक्तव्य अशोभनीय!

Published on

मुंबई, ता. ११ ः उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. १०) नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला असून त्यांनी विकृत मानसिकतेतून हे वक्तव्य केल्याचा प्रतिहल्ला चढवला आहे. फडणवीस यांच्याबाबत ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अशोभनीय असून त्यांच्या ठाकरी नेतृत्वाच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत. त्या वैफल्यातून ते अजून बाहेर आलेले दिसत नाहीत, अशी टीका दरेकर यांनी केली.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून भ्रष्टाचाराचा डाग लागू न देता विकासाभिमुख अशी आपली ओळख करून दिली. फडणवीस यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि वैचारिक राजकारण दिले; पण उद्धव ठाकरे हेच ठाकरे घराण्याला लागलेला कलंक आहेत. ठाकरे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा बळीराजाच्या चेहऱ्यावर कधीही हास्य दिसले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मराठी माणसाचे हित जपण्यासाठी तुम्ही काय केलेत? अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केलेत याचा हिशेब द्या, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

बाळासाहेबांनी हिंदुत्वाची पताका फडकावली. उद्धव ठाकरे यांनी तो हिंदुत्वाचा विचार सोडून हिंदुत्वविरोधी विचारधारेबरोबर जाऊन सरकार बनवले. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्वप्नातील हिंदुत्वालाही उद्धव हे कलंक आहेत. मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्ता असूनही शहर बकाल केलेत. कोविड कामात भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी होत असल्याने उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. त्यांचे नागपूरचे भाषण राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे असे दरेकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.