बेकायदा प्रवासी वाहतूक रडारवर

बेकायदा प्रवासी वाहतूक रडारवर

तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : खासगी बसमधून होणाऱ्या बेकायदा प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई आरटीओने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार एप्रिल ते जुलै महिन्यात ३१७ बसवर केलेल्या कारवाईतून ६ लाख ७३ हजारांचा दंड वसूल केला आहे.
शहरात आजमितीस १२०० शालेय बस नोंदणी आहे; मात्र यापैकी काही जण प्रवासी वाहतूक करत आहेत. शहरातील विविध महामार्गांवर ही वाहने विनापरवाना, फिटनेस, इन्शुरन्स तसेच पीयूसी नसताना नियमबाह्यपणे वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाचे योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या शालेय वाहनांवरील कारवाईतून लाखोंचा दंड वसूल केला आहे.
-----------------------------------------------
अनेकदा खासगी बसमधून प्रवासी वाहतुकीबरोबर व्यावसायिक मालवाहतूक केली जाते. त्यामुळे अशा बसवर आरटीओकडून एप्रिल आणि जुलै या चार महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार ३१७ बसचालकांकडून ६ लाख ७३ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
- हेमांगिनी पाटील, उप-प्रादेशिक अधिकारी, वाशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com