शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्‍के निकाल लागलेल्‍या शाळांचा गौरव

शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्‍के निकाल लागलेल्‍या शाळांचा गौरव

Published on

मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः मुलुंड येथील दहावीमध्ये शंभर टक्‍के गुण मिळवणाऱ्या शाळांचा मुलुंड सिटिझन चॅरिटेबल व आर. आर. एज्युकेशनल ट्रस्ट या संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापकांना स्मृतिचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन सत्‍कार करण्यात आला; तर भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त आंतरशालेय सांस्कृतिक, लोकनृत्य आणि लोकसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या मुलांचे अथवा गटांचे नृत्य, वेशभूषा, थीम चांगली असेल, अशा विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच गटांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन ज्युरीकडून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आर. आर. एज्‍युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. आर. आर. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ६ ऑगस्‍ट रोजी दुपारी ४ ते ८ या दरम्यान संस्थेच्या आर. आर. सभागृह, आर. आर. एज्युकेशनल ट्रस्ट मार्ग, म्हाडा, मुलुंड (पूर्व) मुंबई येथे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.