अपघात पिकअप चालकासह ८०० कोंबड्या मृत्युमुखी

अपघात पिकअप चालकासह ८०० कोंबड्या मृत्युमुखी

Published on

मुरबाड, ता. ११ (बातमीदार) : दोन गाड्यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात चालकासह ८०० कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुरबाड-माळशेज घाट महामार्गावरील आंबेळे (गडगे) गावाजवळ हा अपघात घडला. मंगळवारी पहाटे मुरबाड-माळशेज घाट रस्त्यावर कोंबड्यांनी भरलेला बोलेरो टेम्पो बदलापूरकडे जात होता; तर दुसरी गाडी याच रस्त्यावरून नगरकडे निघाली होती. त्याच वेळी पहाटे पाच वाजता या दोन्ही गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली. यामध्ये पिकअप गाडीचा चालक प्रकाश बबन डुकरे (रा. बेल्हे, जिल्हा पुणे) याचा जागीच मृत्यू झाला; तर बोलेरो टेम्पोमधील जवळपास ८०० कोंबड्याही ठार झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.