माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

दिवा, ता. ११ (बातमीदार) : शिवसेनेचे दिव्यातील उपशहरप्रमुख व माजी नगरसेवक शैलेश पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत शैलेश पाटील यांनी ठाणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. कैलास राजाराम वालेकर व समिश गोविंदन या दोघांकडून मोबाईल फोनद्वारे सोमवारी आपणास जीवे मारण्याची धमकी आल्याचे शैलेश पाटील यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
शैलेश पाटील हे मागील दहा वर्षांपासून दिवा शहरात नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. शैलेश पाटील यांची उद्योजक म्हणून शहरात ओळख आहे. शिवसेनेचे नगरसेवक व उद्योजक असल्यानेच आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करून जीवे मारण्याच्या धमक्या दोघांकडून दिल्या जात असल्याचे शैलेश पाटील यांनी म्हटले आहे. आपल्यावर हल्ला झाल्यास कैलास वालेकर व समिश गोविंदन या समाजकंटकांना याबाबत जबाबदार धरण्यात यावे, असेही शैलेश पाटील यांनी म्हटले आहे. दोन्ही इसम हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून बळजबरीने लोकांच्या जमिनी बेकायदा हडप करण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप शैलेश पाटील यांनी केला आहे. दरम्यान, येत्या १० दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास दिवा शहर बंद व सामूहिक उपोषणाचा इशारा शैलेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com