कोटक अॅसेट मॅनेजमेंटचा ‘कोटक क्वांट’ फंड

कोटक अॅसेट मॅनेजमेंटचा ‘कोटक क्वांट’ फंड

Published on

मुंबई, ता. ११ : कोटक महिंद्र अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने ‘कोटक क्वांट’ फंड बाजारात आणला आहे. याचा एनएफओ १२ ते २६ जुलैदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. यामध्ये किमान पाच हजार व त्यापुढे एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल; तर या काळात गुंतवणूकदारांना दरमहा पाचशे रुपयांची एसआयपीदेखील करता येईल; मात्र त्यात किमान दहा महिने गुंतवणूक करणे बंधनकारक असेल. एनएफओ कालावधी संपल्यानंतरही भाव निश्चित झाल्यावर त्यात केव्हाही गुंतवणूक करता येईल. या फंडातील निधीतून शेअर तसेच शेअरबाजाराशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणुक केली जाईल, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांनी सांगितले. अर्थात या योजनेतील गुंतवणुकीची उद्दिष्टे साध्य होतीलच, याची खात्री देता येत नसल्याचेही कंपनीने कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.