शिवळे महाविद्यालयात युवक महोत्सवाची तयारी

शिवळे महाविद्यालयात युवक महोत्सवाची तयारी

Published on

मुरबाड, ता. ११ (बातमीदार) : मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवक महोत्सवाच्या नियोजनासाठी शिवळे महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला ठाणे व पालघर ग्रामीण मधील १५ महाविद्यालयातून सांस्कृतिक विभाग प्रमुख व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जनसेवा शिक्षण मंडळाचे सचिव पांडुरंग कोर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संचालक मुरलीधर दळवी, मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग समन्वयक नीलेश सावे, ठाणे-पालघर झोनच्या समन्वयक डॉ. जयश्री कवठेकर, सहसमन्वयक डॉ. प्रकाश धुमाळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गीता विशे उपस्थित होते. उद्घाटनपर कार्यक्रमाचे ईशस्तवन ललिता देसले व भाग्यश्री कापडी यांनी गायले. या कार्यशाळेत युवक महोत्सवाचे समन्वयक नीलेश सावे यांची संपूर्ण टीम यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सोपान यशवंतराव यांनी केले; तर निमंत्रक म्हणून प्रा. एम. व्ही. पवार यांनी काम पाहिले. विद्यार्थी विकास विभाग मुंबई विद्यापीठ, मुंबई व शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.