‘राजावाडी’त पीपीपी तत्त्वावर एमआरआय आणि सीटीस्कॅन सेवा

‘राजावाडी’त पीपीपी तत्त्वावर एमआरआय आणि सीटीस्कॅन सेवा

Published on

मुंबई, ता. ११ : पूर्व उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये एमआरआय आणि सिटीस्कॅन सेवा दिली जाते; मात्र त्यासाठी असलेली वाढती मागणी लक्षात घेता राजावाडी रुग्णालयात अशी सेवा देण्यासाठी महापालिका प्रशासनही प्रयत्नशील होते. त्या प्रयत्नांना यश आले असून आता राजावाडी रुग्णालयात पीपीपी तत्त्वावर एमआरआय आणि सिटीस्कॅन सुविधा सुरू करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एमआरआय आणि सिटीस्कॅनसाठी दिवसाला किमान २५ ते ३० हून अधिक रुग्ण येतात. त्यासाठी त्यांना इतर रुग्णालयांत पाठवले जायचे. आता ती गरज भासणार नाही, असे उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.

राजावाडी रुग्णालयात नुकतीच एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन सुरू करण्यात आली आहे. मुंबई पूर्व उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयांत सहा सिटीस्कॅन आणि तीन एमआरआय सेवा सज्ज आहेत. व्ही. एन. देसाई, वांद्र्यातील भाभा, गोवंडीमधील शताब्दी, राजावाडी, कांदिवलीतील शताब्दी आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयांत अशी सुविधा आहे. त्यापैकी व्ही. एन. देसाई आणि वांद्र्यातील भाभा रुग्णालयातील सिटीस्कॅन सेवा पालिका चालवत आहे. उर्वरित रुग्णालयांतील सिटीस्कॅन सुविधा आऊटसोर्स म्हणजेच पीपीपी तत्त्वावर चालवली जाते, असे डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले. पूर्व उपनगराच्या तीन रुग्णालयांत एमआरआय सुविधा उपलब्ध आहे. त्यातील गोवंडी शताब्दी रुग्णालयातील एमआरआय विभाग पालिका चालवतो. कांदिवलीतील शताब्दी आणि राजावाडीमधील एमआरआय सेवा पीपीपी तत्त्वावर असल्याचे सांगण्यात आले.

चांगली आणि माफक सेवा
गेल्या काही काळापासून रुग्णालय प्रशासन दोन्ही सुविधा सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. त्या ठिकाणी दिवसाला १५ ते २० रुग्ण फक्त एमआरआयसाठी यायचे. आता राजावाडीत अशी सुविधा सुरू झाल्याने रुग्णांचा भार कमी होईल आणि रुग्णांना चांगल्या सेवा देता येतील. पालिका रुग्णालयात एमआरआय अडीच हजारांत; तर सिटीस्कॅन बाराशे रुपयांत करण्यात येते, अशी माहिती डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.