जिल्ह्यातील २६ मुले अजूनही शाळेविना

जिल्ह्यातील २६ मुले अजूनही शाळेविना

Published on

कासा, ता. ११ (बातमीदार) : डहाणू प्रकल्पामार्फत पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड करून विविध नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. २०२३-२०२४ हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील २६ विद्यार्थ्यांना शाळेमार्फत आजतागायत नेण्यात आलेले नाही. या मुलांना दोन दिवसांत संबंधित शाळेने नेण्याची मागणी करण्यात आली आहे.

पालकांनी दिलेल्या माहितीनुसार हे विद्यार्थी इयत्ता पहिलीपासून दत्त कला इंटरनॅशनल स्कूल, चिंचोली (भिगवण) येथे शिकत आहेत. त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता अनुदान हे आदिवासी विभागामार्फत देण्यात येते, तसेच तेथे विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही. त्यांना लिहिता-वाचता येत नाही, असे सांगण्यात आले. याप्रकरणी दत्त कला इंटरनॅशनल स्कूल चिंचोली (भिगवण) येथील मुख्याध्यापिकेशी जिजाऊ संघटनेने चर्चा केली. डहाणू प्रकल्पामार्फत अनुदान आलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी प्रवेश देऊ शकत नाही, असे असे उत्तर देण्यात आले. याप्रकरणी डहाणू तालुका अध्यक्ष जिजाऊ संघटनेच्या जावेद खान यांनी डहाणू प्रकल्प अधिकारी यांची भेट घेत दोन दिवसांत मुलांना संबंधित शाळेने नेले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. काही तांत्रिक, आर्थिक बाबी असतील त्या सोडवल्या जातील. संबंधित शाळेशी संपर्क साधून उद्या (ता. १२) त्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी पाठवण्यात येईल.
- संजिता मोहपात्र, डहाणू प्रकल्प अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.